Programs 
दि पूना मर्चंटस् चेंबर तर्फे अनेकता मे एकता रॅलीचे आयोजन

  August 13,2022

  

पुणे, दि. १३ : यंदा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे आज शनिवार दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी "अनेकता मे एकता” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. "अनेकता मे एकता" चा संदेश देणारी विविध राज्यातील नागरिकांप्रमाणे वेशभूषा करुन चेंबरचे सभासद सहभागी झाले होते. भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये भारत मातेची वेशभूषा केलेल्या महिलेचा समावेश रॅलीमध्ये करण्यात आला होता. रॅलीची सुरुवात मार्केट यार्डातील गुळ भूसार विभागातील गेट क्र. ४ पासून करण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया व कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांतजी गरड यांनी पुष्पहार अर्पण करुन समारोप केला.