Programs 
वाणिज्य विश्व दीपावली विशेषांकाचे प्रकाशन

  November 09,2023

  

पुणे, दि. ०९ :  लोक वाचत नाहीत म्हणून दिवाळी अंक प्रकाशित करण्यात खंड पडू नये. कारण सगळेच लोक वाचत नसले तरी काही लोक मात्र ते नक्कीच वाचतात. त्यामुळे जास्तीत जास्त दिवाळी अंक प्रकाशित होणे गरजेचे आहे, असे मत पुण्याच्या उपजिल्हाधिकारी मा. सौ. ज्योती कदम यांनी आज येथे व्यक्त केले. 

 

             दि पूना मर्चंटस् चेंबरचे मुखपत्र "वाणिज्य विश्व" या मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पुण्याच्या उपजिल्हाधिकारी मा. सौ. ज्योती कदम यांच्या हस्ते आज सारसबाग येथील गणपती मंदिरात झाले. या प्रसंगी संपादक प्रविण चोरबेले चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, सहसंपादक आशिष दुगड, वाणिज्य विश्व समिती सदस्य उत्तम बाठिया, संदिप शहा, अशोक अगरवाल, प्रकाश नहार, चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा, वालचंद संचेती, जवाहरलाल बोथरा, विजय मुथा, श्याम लढा, कुणाल ओस्तवाल, दिनेश मेहता, मुकेश गोयल, हरिराम चौधरी, दिलीप रायसोनी इ. कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.  तसेच अनिल गेलडा कल्याणी कॉर्पोरेशन चे गौतम गेलडा डॉ. संजय कंदलगावकर व सुभाष किवडे हेही उपस्थित होते. 

 

त्या पुढे म्हणाले, " वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी जास्तीत जास्त दिवाळी अंक प्रकाशित करावे. मी   दरवर्षी  चार-पाच दिवाळी अंक वाचते यावर्षी त्यात वाणिज्य विषयाच्या दिवाळी अंकाची भर पडली आहे.

 

वाणिज्य विश्वाच्या दिवाळी अंकाची कौतुक करताना त्या म्हणाल्या," गेली ५० वर्ष खंडितपणे वाणिज्य विश्व हे मासिक काढणे  खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यात व्यापारांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध विषयावर लेखन केले जाते. त्याचबरोबर विशेष विविध विषयावर लेखन केले जाते एक मोठी उपलब्ध आहे असे मी मानते.

 

यावेळी बोलताना संपादक श्री. प्रविण चोरबेले म्हणाले, अत्यंत दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण साहित्य प्रसिध्द करण्याची परंपरा याही वर्षी आम्ही जोपासली आहे. यंदाही उपयुक्त साहित्यांनी समृध्द असा अंक प्रसिध्द केला आहे. लेखक, जाहिरातदार आणि हितचिंतकांमुळेच हे शक्य झाले. या अंकाचे स्वागत होईल, अशी आशा आहे. 

 

कार्यक्रमात चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी तसेच त्यांनी वाणिज्य विश्वचे संपादक त्यांचे सहकारी आणि अंक निर्मितीसाठी सहाय्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले, पाहूण्यांचा परिचय सहसंपादक आशिष दुगड यांनी केले, सुत्रसंचालन श्री उत्तम बाठिया यांनी केले व श्री प्रकाश नहार यांनी आभार मानले.