News 
    छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष ( THE POONA MERCHANTS CHAMBER )

    Posted On July 21,2022

      

    पुणे, ता. २० : पॅकिंग केलेल्या आणि लेबल लावलेल्या सर्व खाद्यपदार्थ, अन्नधान्य, डाळींवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे खाद्यपदार्थ, अन्नधान्य वस्तूंमध्ये सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाल्याने नागरिकांच्या घरखर्चावर प्रतिमहिना पाचशे ते एक हजार रुपयांची वाढ हणार आहे. तसेच ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाल्याने छोट्या व्यापाऱ्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे.