Programs 
विद्यार्थी गुणगौरव समारंभ

Pune  July 29,2022

  

शिक्षण हे हुशार होण्याकरिता नसून शहाणे होण्याकरिता असावे, मुलांचा कल व आवड याचा विचार होणे आवश्यक आहे. तुमच्यात असलेली ध्येय आसक्ती व तुमचे पशनच तुम्हाला उंच घेऊन जाते, कठोर परिश्रमला पर्याय नाही. तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये करियर करण्याची संधी द्यावी, असे मौलिक प्रतिपादन मा. डॉ. दिपक शहा यांनी विद्याथ्र्यांना आपल्या मार्मिक शैलीतून मार्गदर्शन केले.

दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने सभासद, दिवाणजी, दलाल आणि हमाल कामगारांच्या इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत ८० टक्क्याहून अधिक व पदवी परिक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या एकूण ५० गुणवंत विद्याथ्र्यांचे सत्कार शुक्रवार दि. २९ जुलै २०२२ रोजी मा. डॉ. संजय रुणवाल, मा. डॉ. दिपक शहा व मा. सौ. प्रतिभाजी रुणवाल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव इश्वर नहार व माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले,
उपस्थित होते.

जग अतिशय वेगाने बदलत आहे. सध्या एका बटनावर सगळी माहिती उपलब्ध होत आहे. शिक्षणातून कौशल्य मिळाले नाही तर शिक्षण व्यर्थ ठरते. तुमचे पालक तुमच्यासाठी काय करतात याचा विचार करु नका. आपण आपल्या पालकांसाठी काय करु शकतो याचा विचार करा. सर्व प्रथम देशाचे उत्तम नागरीक व्हावा. अपयशावर मात करुन पुढे जाण्याची तयारी ठेवा. विपरीत परिस्थितीमध्ये निराश होता त्याला तोंड कसे देता येईल याचा अभ्यास करा, तसेच पालकांनी मुलांना स्वप्न पाहण्याची संधी द्यावी, त्यांच्या पंखाना बळ द्यावे व त्यांच्यावर विश्वास ठेवावा तरच विद्यार्थी यांना जागतिक स्पर्धेत टिकता येईल, असे मार्गदर्शन मा. डॉ. संजय रुणवाल यांनी केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

जे स्वप्न बघतील तेच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील . कॉलेजमधील शिक्षणप्रवास चूकीच्या मार्गाने जाता कामा नये, निवडलेल्या मार्गावर 100 टक्के प्रेम करा व त्या दृष्टीने प्रयत्न करा. तसेच चेंबरच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेच्छा व प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन मा. सौ. प्रतिभाजी रुणवाल यांनी केले. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत रायकुमार नहार, पाहुण्यांचा परिचय अजित बोरा, इश्वर नहार व नवीन गोयल, चेंबरच्या उपक्रमांची माहिती तसेच गुणवंत विद्यार्थी यांना मार्गदर्शन अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले. आभार प्रदर्शन आशिष दुगड तर सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष, कार्यकारणी सदस्य व व्यापारी वर्ग तसेच सत्कारार्थ विद्यार्थ त्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.