Programs 
मार्केट यार्डात कै. बाबा पोकर्णा यांची पुण्यातिथी साजरी

Pune  July 16,2022

  

व्यापार महर्षि स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या पुण्यतिथी निमित्त मार्केट यार्ड परिसरातील त्यांच्या पुतळयास अभिवादन करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, सहसचिव इश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, सर्व माजी अध्यक्ष, कार्यकारी मंडळाचे सदस्य, कै. बाबा पोकर्णा यांचे नातेवाईक पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मा. श्री. मधुकांतजी गरड, भूसार विभाग प्रमुख मा. श्री. प्रशांत गोते व अन्य अधिकारी तसेच व्यापारी वर्ग
मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मार्केट यार्ड परिसरात कै. बाबा पोकर्णा यांचा पुतळा सन २००० मध्ये उभारण्यात आला. स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांचा चेंबरच्या स्थापनेत तसेच स्थापनेनंतर चेंबरच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा आहे. ते सुमारे ३२ वर्षे चेंबरचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कारर्किदित त्यांनी उत्तम कार्य करुन चेंबरला मोठा नावलौकिक प्राप्त करुन दिला. त्यामुळेच चेंबरच्या सभासदांनी त्यांना तहहयात अध्यक्ष केले होते.