Programs 
Today on the auspicious occasion of Independence Day we re-launched our Poona Merchant Chamber website and Twitter account

  August 15,2022

  

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त 15 ऑगस्ट रोजी पुना मर्चंट चेंबर्स च्या वेबसाईट चे  रीलाँचिंग संपन्न
पुना मर्चंट चेंबर्स च्या संचालक मंडळाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या वेबसाईट चे रीलाँचिंग व ट्विटर  अकाउंट चे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बाठीया यांचे शुभहस्ते तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष श्री प्रवीण चोरबेले, सचिव श्री रायकुमार नहार, सहसचिव श्री ईश्वर नहार व इतर संचालक मंडळ सदस्य यांचे प्रमुख उपस्तिथीतीत मोठया उत्साहात संपन्न झाले . संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बाठीया यांनी  सदर वेबसाईट ची निर्मिती करणारे जे ए सोल्युशन्स व रुहा व्हीकार्ड चे संस्थापक व सि ई ओ श्री अलंकार जाधव यांचे विशेष कौतुक करून अतिशय कमी कालावधीत अत्यंत आकर्षक व अत्याधुनिक वेबसाईट ची निर्मिती केल्याबद्दल आभार मानले .
संस्थेचे सचिव श्री रायकुमार नहार यांनी सदर नव्या वेबसाईटचा पुणे जिल्ह्यातील सर्व व्यापारी सभासदांनी आपल्या व्यापरवृद्धी साठी जरूर लाभ घ्यावा व आपल्या व्यापारामध्ये येणाऱ्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी वेबसाईट तसेच ट्विटर अकाउंट द्वारे आमच्याशी जरूर संपर्क करावा असे विनम्र आवाहन सर्व संचालक मंडळाच्या वतीने केले.
पुना मर्चंट चेंबर्स ची नवी वेबसाईट www.pune-merchants. com
यामधील विविध सोई सुविधांबद्दल माहिती देताना या वेबसाईट ची निर्मिती करणारे श्री अलंकार जाधव यांनी सांगितले की सदर वेबसाईट RUHA प्लॅटफॉर्म वर बनवलेली डायनॅमिक स्वरूपाची असून यामध्ये संस्थेची संपूर्ण माहिती, सर्व संचालक मंडळाची माहिती, व्यापारी सभासदांच्या व्यापार जाहिराती, संस्थेचे विविध सामाजिक व व्यापार विषयक उपक्रम, वर्तमानपत्रातील संस्थेच्या विविध ऊपक्रमांची कात्रणे, 'वाणिज्य विश्व ' या व्यापार विषयक मासिकाचे ऑनलाइन वाचन व डाउनलोड सुविधा, संस्थेच्या व्यापारी सभासदांची डिरेक्टरी अशा सुविधा उपलब्ध असून त्यामध्ये संस्थेशी संपर्क व संस्थेचे एक्झाक्ट लोकेशन नेव्हिगेशन या सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्याचा लाभ गरजेनुसार व्यापारी मित्र व सर्वसामान्य ग्राहक देखील सहजपणे घेऊ शकतात. पुणे जिल्ह्यातील चेंबर्स चे सर्व सभासद यांनी आपल्या व्यापाराच्या भरभराटी च्या दृष्टीने जे ए सोल्युशन्स तर्फे निर्मिती असणाऱ्या " रुह व्हीकार्ड" व "इ-कार्ट" टाइप व्हीकार्ड चा देखील लाभ सर्व व्यापरिवर्गाने जरूर घ्यावा असे आवाहन श्री अलंकार जाधव यांनी केले. पुना मर्चंट चेंबर्स ने जे ए सोल्युशन्स व रुहा व्हीकार्ड यांना वेबसाईट निर्मिती ची संधी दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र बाठीया व सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानून भविष्यकाळात कोणत्याही अडचणी सदर वेबसाईट अथवा इतर डिजिटल सोल्युशन्स बद्दल आल्यास आमचे संपूर्ण सहकार्य दिले जाईल असे आश्वासन श्री अलंकार जाधव यांनी दिले.